मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

रस्ता सुरक्षा समितीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा भावपूर्ण सत्कार

  अकोला : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सुनील लहाने मनपा आयुक्त, RTO श्री. भुयार, श्री. प्रसाद पाटील सचिव कार्यकारी अभियंता, डॉ. कुलवाल जिल्हा शल्य चिकित्सक, वाहतूक निरीक्षक श्री. विलास पाटील, श्री. प्रदीप गुरुखुद्दे, श्री. शुभम धोरात, श्री. कृष्णा दायमा तसेच सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती.  अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून, अथक परिश्रमातून, प्रभावी नियोजनातून आणि दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीतून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेत रस्ता सुरक्षा समितीतर्फे. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांचे शुभहस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अर्चित चा...

मनोज भाऊ चव्हाण यांच्या कार्याचा दोन्ही आमदारांकडून गुणगौरव.

 असदपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 2 कोटी 76 लाखांचे अनुदान 




अमरावती : नुकतेच दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी असदपूर येथे सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना २ कोटी ७६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार गजाननराव लवटे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले.यावेळी जुळ्या गावातील सरपंच मोहनराव मुंदाणे, शहापूरचे सरपंच अक्षयभाऊ चऱ्हाटे पदाधिकारी सचिन भाऊ ढवळे शिवाजी चऱ्हाटे, सतिश दाभाडे व अन्य प्रमुख मंडळी उपस्थित होती.


विदर्भातील शेतकऱ्यांवर गेल्या २००६ ते २०१३ या कालावधीत तत्कालीन सरकारने केलेल्या अन्याया विरोधात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांसाठी गेल्या १२ वर्षांपासून प्रचंड असा संघर्ष सुरू होता.या संघर्षाची तिव्रता बघता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी २०२४ मध्ये बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या मागणीच्या अनुषंगाने नियामक मंडळाच्या ८५ व्या बैठकीत विषेश सानुग्रह अनुदान म्हणून प्रति हेक्टरी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले होते. 


विदर्भातील एकुण १६६३३ हेक्टर करीता ८३२ कोटी रुपयांसाठी मान्यता प्रदान करण्यात आली होती. विषेश म्हणजे १६ एप्रिल २०२५ मध्ये अमरावती येथील सांस्कृतिक भवनात सानुग्रह अनुदानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता.आता टप्प्याटप्प्याने हे अनुदान वितरित करण्यात येत असुन दर्यापूर तालुक्यातील मौजे सांगवा येथील चंद्रभागा बॅरेज लघु प्रकल्पात एकुण ४५ सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना दोन कोटी ७६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान प्राप्त झाले होते. 


मंजूर झालेल्या अनुदानाचा धणादेश दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा हा प्रामाणिक उद्देश ठेवून बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सानुग्रह अनुदानाचे वाटप यावेळी दर्यापूर मतदार संघाचे आमदार गजाननराव लवटे व अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दरम्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या कार्याचा गुणगौरव सुद्धा दोन्ही आमदारांकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.


१० वर्षांच्या संघर्षाचं यश अखेर आपल्या हातात बघून उपस्थित प्रकल्पग्रस्तांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर निखळपणे दिसत होता.अत्यंत आनंदात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच मोहन मुंदाणे यांनी भुषविले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ढवळे यांनी केले तर प्रास्ताविक देवानंद भुस्कुट यांनी केले आभार सतिश दाभाडे यांनी मानले.

टिप्पण्या