मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

  पावसासाठी अमरनाथ यात्रेकरूंचा पंचकुंडीय महायज्ञ अकोला : अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप पिके संकटात आली असून, धरणे व जलसाठेही अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. पऱ्हाटी, सोयाबीनसह विविध पिकांना पावसाची नितांत गरज असताना बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी बाबा अमरनाथ यात्रेकरूंनीच थेट वरुणराजाला साकडे घातले. गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सृजन लॉन्स येथे पंचकुंडीय पूर्णाहुती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. गुड मॉर्निंग ग्रुपच्या १८ सदस्यांनी यावर्षी बाबा अमरनाथ यात्रेचे आयोजन केले होते. पहलगाम मार्गे दि. ८ जुलै रोजी बाबा अमरनाथांचे दर्शन घेण्यात आले. जम्मूतील कडक उन्हापासून सुरू झालेला हा प्रवास चंदनवाडी, शेषनाग आणि पंचतरणीचा खडतर मार्ग पार करीत पवित्र अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचला. प्रतिकूल परिस्थिती, डोंगरदऱ्यांचा कठीण प्रवास आणि बदलते हवामान यावर मात करीत सर्व यात्रेकरूंना बाबा बर्फानींचे दर्शन झाले. विशेष म्हणजे, यात्रेनंतर काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे यात्रा बंद करण्याची वेळ आली. मात्र त्यापूर्वीच गुड मॉर्निंग ग्रुपच्या यात्रेकरूंना कोणताही मोठा अडथ...