मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

builder लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

अकोल्यात एलसीबीची मोठी कारवाई

  १६ गॅस सिलिंडर, रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि ऑटोसह साहित्य जप्त अकोला : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरमधून ऑटोमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या कथित टोळीचा पर्दाफाश केला आहे.  या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गॅस सिलिंडर, रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि एका ऑटोसह साहित्य जप्त करण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे छापा पोलीस सूत्रांनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगजीवन रामनगर, टेलिफोन कॉलनी, दुबे वाडी येथील रहिवासी मनोज रमेश दीक्षित हा आपल्या घराजवळील टिनाच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून ऑटोमध्ये अवैधरीत्या गॅस भरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यावेळी एका ऑटोमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरला जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या...

पंकज कोठारी नारेडको महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीचे सह सचिव