मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#AnupDhotre #Akola #FarmerFirst #AgricultureDevelopment #KisanVikas #AtmaNirbharKisan #BJP4Development @bjp4maharashtra @randhirsawarkar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

अकोला एलसीबीची धडक कारवाई अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

  अकोला : जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत २६ ऑक्टोबर २०२६ रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इचे लेआउट परिसरातील गंगानगर येथे छापा टाकून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ किलो ७२० ग्रॅम ओला गांजा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना दिले होते. या निर्देशांनंतर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई २६ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इचे लेआउट येथील गंगानगर परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी शेख सारीम शेख रफीक (वय २१, रा. सायकलपुरा, नांदुरा, जि. बुलढ...

वनविभागाचा हलगर्जीपणा; आमदार अमोल मिटकरी आक्रमक