रस्ता सुरक्षा समितीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा भावपूर्ण सत्कार
अकोला : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सुनील लहाने मनपा आयुक्त, RTO श्री. भुयार, श्री. प्रसाद पाटील सचिव कार्यकारी अभियंता, डॉ. कुलवाल जिल्हा शल्य चिकित्सक, वाहतूक निरीक्षक श्री. विलास पाटील, श्री. प्रदीप गुरुखुद्दे, श्री. शुभम धोरात, श्री. कृष्णा दायमा तसेच सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती.
अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून, अथक परिश्रमातून, प्रभावी नियोजनातून आणि दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीतून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेत रस्ता सुरक्षा समितीतर्फे. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांचे शुभहस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक रस्ते अपघातांच्या संख्येत २७ टक्क्यांनी घट झाली आहे. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी केलेले हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेप्रती असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
सर्वधर्मीय सण-उत्सव शांततेत संपन्न त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जिल्ह्यातील गणेशोत्सव, कावडयात्रा, ईद यांसह विविध धार्मिक सण व उत्सव शांततेत, उत्साहपूर्ण वातावरणात आणि सामाजिक सलोखा जपत पार पडले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेले योग्य नियोजन, पोलीस यंत्रणेतील समन्वय आणि जनतेशी साधलेला संवाद यामुळे जिल्ह्यात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले.
CCTNS क्रमवारीत महाराष्ट्रात अकोला जिल्हा प्रथम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशासकीय कार्यक्षमता आणि कामकाजातील गतिमानता यांमुळे महाराष्ट्र राज्यातील CCTNS क्रमवारीत अकोला जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ही कामगिरी पोलीस दलाच्या आधुनिक, पारदर्शक आणि परिणामकारक कार्यपद्धतीची साक्ष देते. सायबर जनजागृती आणि नागरिक सुरक्षा वाढवणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी जिल्हाभरात व्यापक सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्याचे उपाय, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा