मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

रस्ता सुरक्षा समितीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा भावपूर्ण सत्कार

  अकोला : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सुनील लहाने मनपा आयुक्त, RTO श्री. भुयार, श्री. प्रसाद पाटील सचिव कार्यकारी अभियंता, डॉ. कुलवाल जिल्हा शल्य चिकित्सक, वाहतूक निरीक्षक श्री. विलास पाटील, श्री. प्रदीप गुरुखुद्दे, श्री. शुभम धोरात, श्री. कृष्णा दायमा तसेच सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती.  अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून, अथक परिश्रमातून, प्रभावी नियोजनातून आणि दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीतून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेत रस्ता सुरक्षा समितीतर्फे. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांचे शुभहस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अर्चित चा...

खा.अनुप धोत्रे आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रयत्नाने अकोला-खंडवा रेल्वे मार्गाला गती



अकोला : अकोला-खंडवा या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाच्या कामाला खासदार अनुप धोत्रे आणि खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नाने गती मिळाली आहे. 2027 च्या अखेरपर्यंत या मार्गावर रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे.


नांदेड ते तुकाई थड पर्यंत रेल्वे लाईनवर स्पेशल ट्रेन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली असून अकोला-हिवरखेड मार्गाचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील डोंगराळ भागात 6.7 किमी लांबीचा बोगदा तयार केला जात असून त्यापैकी 1 किमी भाग मध्य प्रदेशात तर 5.7 किमी भाग महाराष्ट्रात येतो.


खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त केले आहेत. विदर्भाला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय असून या मार्गामुळे पश्चिम विदर्भाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या