मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

रस्ता सुरक्षा समितीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा भावपूर्ण सत्कार

  अकोला : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सुनील लहाने मनपा आयुक्त, RTO श्री. भुयार, श्री. प्रसाद पाटील सचिव कार्यकारी अभियंता, डॉ. कुलवाल जिल्हा शल्य चिकित्सक, वाहतूक निरीक्षक श्री. विलास पाटील, श्री. प्रदीप गुरुखुद्दे, श्री. शुभम धोरात, श्री. कृष्णा दायमा तसेच सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती.  अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून, अथक परिश्रमातून, प्रभावी नियोजनातून आणि दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीतून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेत रस्ता सुरक्षा समितीतर्फे. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांचे शुभहस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अर्चित चा...

२३ ऑक्टोबरला विसर्जन मिरवणूक

 एकता नवदुर्गा मंडळाच्या उत्सवात आठ हजार नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ




अकोला : शहरातील मलकापूर परिसरातील व्ही.एच.बी. कॉलनी येथील एकता नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांची एकजूट, सामूहिक नियोजन आणि नागरिकांच्या सहभागातून उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. १३ फूट उंचीची देवीची मूर्ती, आकर्षक मंडप सजावट, गरबा रास आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवाची प्रमुख आकर्षणे ठरली.


११ ते २३ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या उत्सवाची सुरुवात घटस्थापना व देवीच्या आगमन सोहळ्याने झाली. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ललिता पंचमीला महिला भजन मंडळाचे सादरीकरण, तर अष्टमीला होमहवन करण्यात आले.


दररोज आयोजित गरबा रासमध्ये तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. गरबा नृत्य आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना दररोज पारितोषिके देण्यात आली. लहान मुलांच्या गरबा नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


बुधवारी (दि. २१) आयोजित महाप्रसादाचा सुमारे आठ हजार नागरिकांनी लाभ घेतला. उत्सवादरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मंडळाला भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांनीही आरतीला उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले.


अध्यक्षपदाऐवजी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना, मंडळात स्वतंत्र अध्यक्ष नसून प्रत्येक कार्यकर्ता हा अध्यक्ष असल्याची संकल्पना राबविण्यात येते. या सामूहिक नेतृत्वातून कार्यकर्त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडत उत्सवाचे नियोजन केले. व्ही.एच.बी. कॉलनीतील नागरिकांच्या सहभागामुळे सामाजिक एकोपा आणि एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले.


शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ६ वाजता देवीच्या विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या