मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासाठी आमदार रणधीर सावरकर मैदानात; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश! अकोला : परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येची गंभीर दखल घेत आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी स्वतः पुढाकार घेत वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कापसी, चिखलगाव, माझोड, गोरेगाव, निंबी, कळंबेश्वर, लाखनवाडा, वरखेड, वाघजाळी आदी गावांमध्ये वारंवार होणारे लोडशेडिंग व अनियमित  वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार सावरकर यांनी तत्काळ वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रश्न प्रलंबित न ठेवता आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. परंतु ओहर लोड मूळे, ईमर्जन्सी लोड शेडिंग मुळे अशा अडचणी येत आहेत हे अधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिले असल्यामुळे   शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तासा पैकी किमान सलग ५ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण...

आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश

 


अकोला दि. 25 : लवकरच महानगरपालिकेच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. आवश्यकता असल्यास, शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करावी असे यावेळी ते म्हणाले.


स्थायी समिती सभागृहात मनपा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकमीध्ये नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनिल मेश्राम, नितिन ताकवाले, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

 या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणा-या तयारी व उपाययोजना संदर्भात संपुर्ण आढावा घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजीटलाईज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता ज्या शाळा गळतात त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांव्दारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमीत भेटी देऊन विद्यार्थ्यांना येणा-या समस्या जाणून घेणे व तात्काळ निकाली काढणे, मनपा शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करणे, काही शाळेतील शिक्षक ऊशीरा शाळेत येतात आणि शाळेतून लवकर घरी जात असल्याने त्यांना वेळेवर शाळेत येणासाठी ताकीद आदींबाबत निर्देश दिले. मनपा शाळांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी एक तपासणी समिती गठीत करण्याचे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले आहे. 

 यावेळी शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान हबीबुर्रहमान, शिक्षण विभागाचे संजय खराटे आदींची उपस्थिती होती. 


टिप्पण्या