वैशिष्ट्यीकृत

 शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासाठी आमदार रणधीर सावरकर मैदानात; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश!




अकोला : परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येची गंभीर दखल घेत आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी स्वतः पुढाकार घेत वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

कापसी, चिखलगाव, माझोड, गोरेगाव, निंबी, कळंबेश्वर, लाखनवाडा, वरखेड, वाघजाळी आदी गावांमध्ये वारंवार होणारे लोडशेडिंग व अनियमित  वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्यासमोर मांडली.

शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार सावरकर यांनी तत्काळ वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रश्न प्रलंबित न ठेवता आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. परंतु ओहर लोड मूळे, ईमर्जन्सी लोड शेडिंग मुळे अशा अडचणी येत आहेत हे अधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिले असल्यामुळे  

शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तासा पैकी किमान सलग ५ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले. तसेच जलालाबाद सबस्टेशनवरून नवीन वीज वाहिनीचे कामही उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.


 माझोड सबस्टेशनसाठीही आ. सावरकर यांचा पुढाकार


माझोड येथे प्रस्तावित सबस्टेशन काही तांत्रिक कारणांमुळे रद्द झाले होते. हा महत्त्वाचा प्रश्नही आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी गांभीर्याने घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून माझोड सबस्टेशनचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे माझोड व परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.


“शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण राहता कामा नये आणि शेतीच्या हंगामात वीज नियमित व पुरेशा वेळेत मिळाली पाहिजे,” या भूमिकेतून आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ आश्वासन न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वेळेची मर्यादा निश्चित करत कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार रणधीरभाऊ सावरकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.


टिप्पण्या