वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

  


 मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले. 


त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली.


शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि.आर.आठ दिवसात काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एक वर्ष उलटून गेले असताना सुद्धा सदर विषयावर निर्णय झाला नव्हता.या संदर्भात आमदार प्रताप अडसड यांनी सुध्दा पाठपुरावा केला होता.अखेर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावून सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील जि.आर. तातडीने काढण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अखेर मंत्री संजय राठोड यांनी पुर्ण केली. यासाठी मंत्री संजय राठोड यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.तर संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे आभार मानुन आनंद व्यक्त केला.

       या बैठकीला आमदार प्रताप अडसड,आमदार शामभाऊ खोडे,व्हि.सी.द्वारे आमदार सईताई डहाके, आमदार हरिष पिंपळे बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण, सहसचिव अजयभाऊ भोयर, संघटन सचिव राजु लोणकर, विश्वनाथ शिंदे व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

                   या बैठकीला संबंधित विभागाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर,अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता,मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र नागपूर, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभाग, नागपूर, अमरावती, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद ( ल.पा.) वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गडचिरोली हे उपस्थित होते.

टिप्पण्या