मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासाठी आमदार रणधीर सावरकर मैदानात; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश! अकोला : परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येची गंभीर दखल घेत आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी स्वतः पुढाकार घेत वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कापसी, चिखलगाव, माझोड, गोरेगाव, निंबी, कळंबेश्वर, लाखनवाडा, वरखेड, वाघजाळी आदी गावांमध्ये वारंवार होणारे लोडशेडिंग व अनियमित  वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार सावरकर यांनी तत्काळ वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रश्न प्रलंबित न ठेवता आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. परंतु ओहर लोड मूळे, ईमर्जन्सी लोड शेडिंग मुळे अशा अडचणी येत आहेत हे अधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिले असल्यामुळे   शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तासा पैकी किमान सलग ५ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण...

प्रांत संघटन मंत्री मनोज साबळे यांच्या हस्ते श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक

 





अकोला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विदर्भ प्रांत संघटन मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मनोज साबळे यांचे आज राजराजेश्वर नगरी अकोला येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी अभाविप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                     अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारी परिषद दि. २९ ते ३१ मे २०२६ दरम्यान भुवनेश्वर (ओडिशा) येथे संपन्न झाली. या बैठकीत अभाविपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मनोज साबळे यांची विदर्भ प्रांत संघटन मंत्री म्हणून घोषणा केली. त्यांच्या कार्यकेंद्राची जबाबदारी नागपूर येथून सांभाळली जाणार आहे. या नियुक्तीमुळे विदर्भातील विद्यार्थी चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.




              नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच अकोला येथे आगमन झालेल्या मनोज साबळे यांचे विविध स्तरांवर स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने त्यांनी श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करून दर्शन घेतले. या धार्मिक विधीद्वारे त्यांनी आपल्या नव्या कार्यकालासाठी आशीर्वाद घेत समाजहित, राष्ट्रहित आणि विद्यार्थीहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

       


           यानंतर श्री राजराजेश्वर संस्थानच्या वतीने श्री गजानन घोंगे यांनी शाल व श्रीफळ देऊन मनोज साबळे यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा देत भावी कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

           या कार्यक्रमास अभाविपचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा. उमेश कुडमेथे, महानगर अध्यक्ष प्रा. दिलीप बांगर, राष्ट्रीय कला मंच चे प्रांत प्रमुख अविनाश तोडसाम, विभाग संयोजक सुहास मोरे, नगर मंत्री परीक्षित कोल्हे, महानगर विस्तारक अनुराग बालेकर, आदित्य केंदळे, गोविंद घुले, तसेच तनय यांच्यासह महानगरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

              मनोज साबळे यांच्या विदर्भ प्रांत संघटन मंत्रीपदी झालेल्या नियुक्तीमुळे अभाविपच्या संघटनात्मक कार्याला नवचैतन्य प्राप्त होणार असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व विकासाच्या उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अकोल्यातील त्यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात विदर्भभर संघटन विस्तारासाठी व्यापक उपक्रम राबविले जाणार असल्याची चर्चा यावेळी रंगली.

टिप्पण्या