मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

नालंदा नगर येथे बुद्ध जयंती साजरी

 



अकोला, दि. १ मे : स्थानिक नालंदा नगर वॉर्ड क्रमांक १५ येथे दिनांक १ मे, २०२६ रोजी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सर्वप्रथम तथागत बुद्ध व महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रा. डॉ. एम.आर. इंगळे यांचे हस्ते पुष्प व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर समाज कार्यकर्ते सुनील गणवीर यांनी धम्म ध्वज फडकविला व सेवानिवृत्त पोलिस जमादार राजकुमार गणवीर यांनी धम्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. 

महिला संघाचे वतीने सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करून बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक आयु. एम.के.अवचार यांनी आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे, सर्वांशी प्रेमाने वागावे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भारत बुद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी झटावे असे उद्बोधनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता पेढे वाटून झाली. याप्रसंगी प्रामुख्याने गोपाल चव्हाण, संजय धुर्वे, सौ. सुशीला अवचार, सौ.जोस्ना गणवीर, सौ. वैशाली गवई, सौ. करुणा गणवीर, आर्यन गणवीर, पूजा अवचार, ततेराव ताजने, सौ. रेखा ताजने, समीक्षा गणवीर यांच्यासह नालंदा नगरातील सर्व उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते.

टिप्पण्या