मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

जीमसी मधील भरती बेपत्ता अनोळखी रुग्णाची ओळख पटविण्याचे आवाहन

 


अकोला : दिनांक 28 मार्च 2026 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील अस्थिव्यंगशास्त्र विभाग अंतर्गत वार्ड क्रमांक 18 मध्ये एक अनोळखी पुरुष भरती केला आहे. या रुग्णाचे नाव शेख रहमान शेख बुरहान असून अंदाजित वय 70 वर्ष आहे. 


रुग्णालय नोंदणी क्रमांक 338149 असून राहणार गुलजारपुरा अकोला असा पत्ता सांगत आहे. परंतु अजूनतरी कोणीही त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी रुग्णाची ओळख पटविण्यासाठी पुढे आलेले नाहीत. सदर अनोळखी रुग्णाला गंभीर अवस्थेत 108 च्या रुग्णवाहिकेने सोहेल खान यांनी सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे. असे 108 ॲम्बुलन्सच्या डॉक्टर नागेश जयस्वाल यांनी सांगितले आहे. 


सदर रुग्णाची कोणालाही ओळख पटल्यास किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी सर्वोपचार रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे (मोबाईल क्रमांक 8380830182) यांच्याशी संपर्क साधावा.


 अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम यांच्या देखरेखीमध्ये रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभाग मधील पथक क्रमांक 2 चे पथक प्रमुख डॉ.अमित जाधव, डॉ. हर्षल घोपे यांनी रुग्णावर ऑपरेशन करून पाय दुरुस्त केला आहे.


 अधीसेविका ग्रेसी मरियान, वार्ड परिसेविका श्रीमती वनिता निमकडे, परिचारिका सविता मोहडकर, मनीषा सावडे, प्राजक्ता प्रताप, पूजा मुरूमकर तसेच कक्षसेवक निता जाधव आणि सफाईकामगार गणेश अंभोरे, दीपक देशमुख, ज्योती राजपुरे, अश्विनी वनकर हे रुग्णाची दैनंदिन परिचर्या, देखभाल व काळजी घेत आहेत. सदर अनोळखी रुग्णाचे नातेवाईक पुढे आल्यावर रुग्णाचे डिस्चार्ज दरम्यानचे पुनर्वसन, मदत, समन्वय व मेडिकल सोशल वर्क करण्याचे कामकाज समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे करणार आहेत. तसेच त्यांना मदतनीस म्हणून अमित मिटकरी मेडिकल सोशल वर्कर हे मदतनिस म्हणून काम पाहत आहेत.

टिप्पण्या