मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

शेगाव येथील भाजपच्या कार्यशाळेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


अकोला : भाजपच्या वतीने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' उपक्रमाअंतर्गत विदर्भ विभागीय कार्यशाळा शेगाव येथे आज पार पडली. यावेळी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 


राष्ट्रहिताची विचारधारा, विकासाभिमुख कार्यसंस्कृती आणि पक्षाप्रति समर्पण हेच आपल्या भाजपा परिवाराचे सामर्थ्य आहे, असे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.




 यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी विकासाच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षवाढ, संघटन विस्तार, बूथ स्तरावरील बळकटीकरण आणि जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंत्री ॲड आकाश फुंडकर, खा.अनुप धोत्रे, महाराष्ट्र विधानसभेतील भाजपाचे मुख्य प्रतोद आ. रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सचिव माजी आमदार प्रवीण पोटे, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, धर्मपाल मेश्राम, दिनेश सूर्यवंशी, अकोला महानगर अध्यक्ष जयंत मसने विजय अग्रवाल आदी मान्यवरांसह अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या