मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आमदार सावरकरांचे निकटवर्तीय संकेत काटे यांनी व्हिएतनाममध्ये रोवला यशाचा झेंडा ! अकोला, दि. 20 ऑगस्ट 2026 : अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष काटे यांचे चिरंजीव संकेत काटे यांना व्हिएतनामच्या दा नांग येथे बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज आणि बजेल प्रोजेक्ट्सचे MD & CEO राजेश गणेश यांच्या हस्ते "बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. संकेतने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या संकेतने वडिलांच्या कष्टातून आणि आई-वडिलांच्या संस्कारांवर आज मुंबई येथे आपल्या कर्तुत्वाने नाव कमावले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. आमदार सावरकर यांच्या शुभेच्छा ! संकेतने आपल्या कर्तृत्वाने व्हियेतनाम मध्ये प्राप्त केलेल्या पुरस्काराने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! - आमदार रणधीर सावरकर

संत गजानन महाराजांच्या नावाने ओळखले जाणार शिवनी विमानतळ

 



अकोला : शिवणी विमानतळाचे"श्री संत गजानन महाराज विमानतळ" नामकरण करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली. त्यानंतर केंद्र शासनाला आवश्यक शिफारस करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव, विमान चालन यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याची माहिती भाजपचे प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी दिली आहे.


 महाराष्ट्र शासनाने अकोला विमानतळाचे भुसंपादनाकरीता २०८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने, अकोला येथील शिवणी विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीत असून अल्पावधीत सदरचे विमानतळ लोकसेवेत रुजू होणार आहे. आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी अकोलेकरांच्या मागणीची पूर्तता केली. 


अकोला शहरानजिक शेगाव, जि. बुलढाणा येथे श्री संत गजानन महाराजांचे पावन वास्तव्य असल्याने शेगाव नगरीला विदर्भाची पंढरी असे संबोधले जाते. या ठिकाणी लाखो भाविक-भक्त व वारकरी श्री संत गजानन महाराजांच्या आशिर्वाद व दर्शनासाठी येत असतात. शेगाव येथे येण्याकरीता मध्य रेल्वेची तसेच महामार्गाची व्यवस्था आहे. परंतु देश आणि परदेशातून येणा-या श्रद्धाळू भाविकांना संत नगरी शेगाव येथे येण्याकरीता कोणतीही हवाई वाहतूक उपलब्ध नाही. त्या कारणाने अकोला शहरातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणाचे काम तातडीने करण्याकरीता आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी शासनास विनंती केली आहे. तसेच आमदार व खासदारद्वयांनी अकोला येथील शिवणी विमानतळाचे श्री संत गजानन महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने निर्णय व्हावा व सदर नामकरण करण्याकरीता केंद्र शासनाला शिफारस करण्यास विनंती केली आहे. 


या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सचीव यांना निर्देश दिले. प्रस्ताव सादर करून लवकरच मंत्री मंडळाची मान्यता प्राप्त होऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भातील पंढरी व संत गजानन महाराज संत परंपरा संस्कृतीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सावरकर यांच्या मागणीची पूर्तता केली आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट