मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

वरिष्ठ विधिज्ञ मोतीसिंहजी मोहता यांची यशस्वी अँजिओप्लास्टी, प्रकृती धोक्याबाहेर

 



अकोला : येथील ज्येष्ठ विधिज्ञ तसेच बेरार जनरल एज्युकेशन (BGE) सोसायटीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीचे अध्यक्ष मोतीसिंहजी मोहता यांना मध्यरात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.


रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू करत पहाटे सुमारे 3 वाजता अँजिओप्लास्टी केली. या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या हृदयात दोन स्टेंट बसविण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर असून आता ते धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.


सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत आहे. ही बातमी समजताच शहरातील विधिज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच सार्वजनिक गणपती मंडळातील पदाधिकारी आणि नागरिकांनी भेट घेण्यासाठी रुग्णालयाकडे धाव घेतली. मोतीसिंह मोहता यांची प्रकृती पूर्वीप्रमाणे निरोगी राहावी यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रार्थना केली आहे.

टिप्पण्या