मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

शिवसेनेतर्फे शुगर तपासणी यंत्राचे आ. राजन साळवी यांच्या हस्ते वाटप

  



अकोला - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक अनिल मालगे यांच्या तर्फे अकोला जिल्ह्यात शुगर तपासणी यंत्र मोफत वितरित करण्याचा शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अकोला जिल्हा संपर्कप्रमुख आमदार राजन साळवी यांच्या हस्ते हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे करण्यात आला. 


यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते अकोला जिल्हा संपर्कप्रमुख आमदार राजन साळवी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असेच कार्य अभिप्रेत असून 80 टक्के समाजकारण या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत हे यंत्र पोहोचण्यासाठी शिवसैनिक तयार राहतील असे मत व्यक्त केले. 


यावेळी शिवसेना महानगर प्रमुख राजेश मिश्रा, माजी नगरसेवक गजानन चव्हाण,रवि मांडावी, कार्तिक मिश्रा,संगीताताई शुक्ला उप जिला प्रमुख ,निशा ताई ग्यारल महानगर प्रमुख,उज्जवला इंगळे शहर प्रमुख पश्चिम,जयश्री धारप्रमुख शहर प्रमुख पूर्व, आयोजक अनिल मालगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम सोहळा माजी आमदार गोपीकिसन जी बाजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले, शिवसेना महिला आघाडी प्रमुख उषाताई विरक, शिवसेना महानगर उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे. महानगरासह जिल्ह्यात हे यंत्र वाटप करणार असल्याचे आयोजक अनिल मालगे यांनी सांगितले अशी माहिती गणेश भुजबले यांनी दिली.

टिप्पण्या