मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

मोरणा नदीचा कायापालट करून दाखवू : जयंत मसने

 



अकोला : भाजप विरोधक महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराजित झाल्याने, हताश, निराश व सत्तेपासून वंचित राहिल्याने सत्तारूढ शहर सुधार समिती च्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झाले तरी मोरणा नदीचा आम्ही कायापालट करून दाखवू अशी ग्वाही भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी दिली. आपली नदी आपली जबाबदारी अभियानाच्या पाचव्या दिवशी त्यांनी वरील विचार व्यक्त केले. 

 


आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल,महापौर शारदाताई रणजीत खेडकर, पवन महल्ले, भाजप अकोला महानगराध्यक्ष जयंत मसने, सिद्धार्थ शर्मा, अर्चनाताई शर्मा, किशोर पाटील, करण शाहू, अमोल मोहकार, राजेंद्र गिरी, प्रकाश धोगलीया, हेमंत शर्मा तुषार भिरड वैशाली शेळके चंदा शर्मा चंदा ठाकूर, निशा कडी, विजय चौधरी, शितल जैन, गणेश अंधारे जाकीर हुसेन, डॉक्टर राजू देशपांडे डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर प्रशांत अग्रवाल, अमोल गीते दिलीप मिश्रा सागर शेगोकार अजय शर्मा, राजेश्वर धोटे, नितीन ताकवले मंजुषाताई शेळके, सह विविध क्षेत्रातील नऊ सामाजिक संघटना व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पंचमुखी हनुमान मंदिर ते अक्कलकोट मंदिर परिसरासमोरील मोरणा नदी साफसफाई अभियानामध्ये सक्रिय योगदान दिले. अकोला महानगरपालिकेतील अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व ब्राह्मण एकता मंच, युवा संघटन, बेरोजगार युवाशक्ती, श्री जानकी वल्लभो, मातृ शक्ती सत्संग मंडळ, राजेश्वर भक्त मंडळ, विठ्ठल रुक्माई युवाशक्ती मंडळ यांनी या कार्यक्रमांमध्ये कार सेवा करून आज पाचव्या दिवशी सुद्धा सफाई अभियान राबवून आपली नदी आपली जबाबदारी या अंतर्गत मोरणा नदी सफाई अभियानामध्ये आपला हातभार लावला. 

टिप्पण्या