मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आमदार सावरकरांचे निकटवर्तीय संकेत काटे यांनी व्हिएतनाममध्ये रोवला यशाचा झेंडा ! अकोला, दि. 20 ऑगस्ट 2026 : अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष काटे यांचे चिरंजीव संकेत काटे यांना व्हिएतनामच्या दा नांग येथे बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज आणि बजेल प्रोजेक्ट्सचे MD & CEO राजेश गणेश यांच्या हस्ते "बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. संकेतने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या संकेतने वडिलांच्या कष्टातून आणि आई-वडिलांच्या संस्कारांवर आज मुंबई येथे आपल्या कर्तुत्वाने नाव कमावले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. आमदार सावरकर यांच्या शुभेच्छा ! संकेतने आपल्या कर्तृत्वाने व्हियेतनाम मध्ये प्राप्त केलेल्या पुरस्काराने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! - आमदार रणधीर सावरकर

ऐतिहासिक सुवर्णक्षण, संविधानाच्या सिंधी आवृत्तीचे दिमाखदार विमोचन !

 



अकोल्याचे सिंधी शिष्टमंडळ राजधानीत


नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या 'भारतीय संविधानाचे' आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन झाले असून, या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते उपराष्ट्रपती भवनात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला




या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अकोल्यातील कणखर नेतृत्व, माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिशभाई आलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या शिष्टमंडळाने या राष्ट्रीय सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवून जिल्ह्याची मान उंचावली. अकोल्याचे युवा खासदार अनुप धोत्रे यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला अधिकच वजन देऊन गेली.

 सिंधी भाषेतील हे संविधान देवनागरी आणि फारसी अशा दोन्ही लिपींमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून भाषेचा वारसा जपला जाईल.'सिंधी समाज हा संघर्षातून उभा राहिलेला समाज आहे. फाळणीनंतर विखुरलेल्या या समाजाला त्यांच्या मातृभाषेनेच एकत्र बांधून ठेवले,' अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. मातृभाषेत संविधान आल्याने सिंधी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लोकशाहीची मूल्ये पोहोचण्यास मदत होईल.




सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात भारतीय संविधानाच्या सिंधी भाषेतील अधिकृत आवृत्तीचे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात विमोचन करण्यात आले. सिंधी समाजाच्या इतिहासात हा क्षण सुवर्णअक्षरांनी कोरला जावा असा ठरला असून, या ऐतिहासिक प्रसंगी अकोल्यातील सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने विशेष उपस्थिती दर्शवली.


भाषेचा वारसा आणि लोकशाहीचा सन्मान


विमोचित करण्यात आलेली संविधानाची ही आवृत्ती देवनागरी आणि फारसी अशा दोन्ही लिपींमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. यावेळी उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सिंधी समाजाच्या संघर्षाचा आणि जिद्दीचा गौरव केला. फाळणीच्या वेदना सहन करणार्‍या सिंधी समाजाला त्यांच्या मातृभाषेनेच एकत्र ठेवले आणि त्यांची ओळख टिकवून ठेवली, असे प्रतिपादन त्यांनी केले. मातृभाषेत संविधान उपलब्ध झाल्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग आणि विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




अकोल्यातील सिंधी बांधवांची उपस्थिती


या कार्यक्रमाला केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी, आणि खासदार शंकर लालवानी यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे उपस्थित होते. अकोला सिंधी समाजाच्या या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली असून, हा क्षण संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. अकोल्यातून माजी नगराध्यक्ष व अध्यक्ष, अकोला थॅलेसेमिया सोसायटी हरिशभाई आलिमचंदानी,सिंधी जनरल पंचायत चे अध्यक्ष रमेशभाई जग्यासी,विनोद मनवानी,कन्हैयालाल रंगवानी,सुरेशसेठ संतानी,हरीशभाई कटारिया, कन्हैयालाल आहुजा,कमल आलिमचंदानी,इंजि. संदीप आलिमचंदानी यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट