मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक  अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना  निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.  प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण 18 एप्रिल रोजी अकोल्यात

 



(विशाल पुरंदरे)

अकोला : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण हे 18 एप्रिल रोजी अकोला दौऱ्यावर येणार असून, शहरातील सिटी स्पोर्ट (मूर्तिजापूर रोड) येथे आयोजित मेळाव्यात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

'मागासवर्गीय व अनुसूचित जाती मोर्च्यासोबत संवाद'

या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या मागासवर्गीय व अनुसूचित जाती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांसोबत विशेष संवाद साधण्यात येणार आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. 


प्रमुख नेत्यांची उपस्थिती


या कार्यक्रमाला भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदाताई खेडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


दुपारी ४ वाजता सिटी स्पोर्ट येथे मेळावा


दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मूर्तिजापूर रोडवरील सिटी स्पोर्ट येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघटनात्मक बळकटी, सामाजिक विषय आणि पक्षाच्या आगामी उपक्रमांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन


भाजपाच्या वतीने मागासवर्गीय आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दौऱ्यामुळे अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या