मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  अकोला, दि. ९ जुलै : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. गिरीश गोखले , प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कु. रिदम शाह उपस्थित होत्या. यावेळी अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.           प्रास्ताविकात प्रा. दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रांतील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.            यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया पाटील (१००% गुण), ईशान आडे, तेजल भा...

शारदाताई खेडकर, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात मोरणा स्वच्छतेसाठी 10 संघटना सरसावल्या

  




अकोला : अकोला महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दुसऱ्या दिवशी सुद्धा मोरणा नदी स्वच्छता अभियान जोरात सुरू होते. मोरणा नदीचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी भाजप नेते रणजीत खेडकर व विजय अग्रवाल मोरणा नदीच्या काठावर तळ ठोकून बसले आहेत.

 800 मीटर जलकुंभी काढण्याचे काम आतापर्यंत पूर्ण झाले. विविध सामाजिक संस्था संघटना मोरणा नदी स्वच्छतेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत.




 यामध्ये जगदंबा मित्र मंडळ, संत गाडगेबाबा मित्र मंडळ, झुलेलाल युवाशक्ती, श्याम बाबा युवाशक्ती, राज राजेश्वर युवाशक्ती, आदिवासी युवाशक्ती , अमरनाथ यात्रा युवाशक्ती यासह विविध सामाजिक संघटना सहभागी आहेत. या संघटनांमधील कार्यकर्त्यांचे स्वागत भाजप नेते आमदार रणधीर सावरकर यांनी केले. 

जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी टीमवर्क आवश्यक आहे. रचनात्मक कार्य करण्यासाठी वेळेसोबत परिश्रमाची गरज आहे. कोणालाही नावे ठेवणे सोपे आहे मात्र प्रत्यक्षात काम करून दाखविणाऱ्याच्या मागे जनता उभी असते असे प्रतिपादन महापौर शारदाताई खेडकर यांनी केले आहे.




मोरणा नदी अकोला शहराची जीवनवाहिनी आहे. आपली नदी स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्व संस्था संघटनांना सोबत घेऊन एकत्रितपणे काम करू असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. प्रसंगी आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, अध्यक्ष श्री जयंतराव मसने, मनपा सभापती श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ शारदाताई खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

  या कार्यक्रमाला श्री किशोर मांगटे पाटील,अमोल गोगे, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, पवन महल्ले, सागर शेगोकार, संदीप गावंडे, तुषार भिरड, अमोल गिते, गोपाल मुळे, रणजित खेडकर, संतोष पांडे,राजेंद्र गिरी, सौ वैशाली शेळके, आरती घोगलिया, चंदा शर्मा, ऍड. कल्पना गोटफोडे, सागर शेगोकार, हरीश काळे, प्राची काकड, रंजना विंचनकर, डॉ राजु देशपांडे, डॉ अभय जैन, डॉ सुजित फोकमारे, डॉ नरेश गौड, डॉ तुषार मालोकार, शरद तूरकर, नितीन ताकवाले,संदीप शेगोकार, विनोद मनवाणी विनोद मापारी ,किशोर वऱोकार, विशाल इंगळे, हर्षद भांबेरे, संतोष डोंगरे, कृष्णा पांडे, गजानन सोनोने, दिलीप भरणे, संजय झाडोकार, धनंजय धबाले, सिद्धार्थ शर्मा अजय शर्मा, शारदा ढोरे, सुनील बाठे, संजय बडोणे, प्रशांत अवचार, दिलीप मिश्रा, रश्मी अवचार, सिद्धार्थ उपरवट, शाम विंचनकर हर्ष चौधरी,जमीर खान रंजना विचनकर प्राची काकड, योगेश मानकर, सुरज शेळके, रिचा शहा, ऋचा पाटील, प्रणिता समरीतकर, रुचा पाटील, योगिता पावसाळे,भाग्यश्री देशमुख, वासुदेव गोलाईत, राहुल चौरसिया, नवीन जाधव, अमोल वानखडे, अनिकेत पवार, विक्की भिसे, गोपाल नागपुरे, रितेश जामणारे, ऋषिकेश महल्ले, गजानन पावसाळे, प्रणित अग्रवाल,अतुल अग्रवाल, बाळू ताले, अमित इंगळे, अरविंद कोरपे, आकाश श्रीनाथ गजानन वाडेकर, पंडित हेमंत शर्मा, विवेक भरणे माधव मानकर, मनीष गावंडे, सचिन अहिर, बाळू खंडारे, ऋषिकेश देवर, नवीन जाधव सिद्धेश्वर पाटील, गणेश सपकाळ विकी ठाकूर, तसेच आदी महानगर पदाधिकारी, मंडळा पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.

टिप्पण्या