https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_11.html
शिवाजी अभियांत्रिकीचा रोबोट डॉग शो गाजला
अकोला: श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाद्वारे नेहमीच नवनवीन प्रयोग केले जातात. डॉक्टर संदीप अवचार यांच्या मार्गदर्शनात येथील विद्यार्थ्यांनी 7 मार्च 2025 रोजी "टेकनॉब्लिट्झ २k२५" या समारंभात सादर केलेल्या रोबोट डॉग च्या नृत्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
समारंभाचे उदघाटन प्रा रश्मी टाले यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून FASAL PKV Akola चे श्री प्रशांत खांडे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात, विभागप्रमुख तथा कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ.श्रीकांत सातारकर व डॉ.सचिन अग्रवाल तसेच डीन डॉ.गोपाल झामरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी ' रोबोट डॉग शो ' चे संचालन डॉक्टर संदीप अवचार यांनी केले. किट्स अकोला (KITS ,Akola ) द्वारे कृत रोबोट डॉग च्या विविध कार्याचे प्रदर्शन या द्वारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले. या शिवाय टेक्नोब्लिट्झ मध्ये गूगलर, स्किल बस्टर, मुवि मेनिया ,लॅन गेमिंग,शालेय विद्यार्थ्याकरीता क्विझ कॉम्पिटिशन असे विविध इव्हेंट देखील आयोजित करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ .प्रशांत थोरात, डॉ संजय मकवाना, डॉ गोपाल झामरे, डॉ.सुनील अग्रवाल, डॉ.अभिनंदन गुप्ता, तसेच कार्यक्रमाचे स्पॉन्सरर च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
Lan Gaming, PUBG game मध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकी चे प्रणव टेकाडे, दर्शन वानखडे, मुकेश डोंगरे, मोरेश्वर भिसे प्रथम,आर. एल .टी. चे यश सावंत प्रज्वल अरकराव,हितेश वानखडे , वंश हिवराळे द्वितीय क्रमांक पटकावला. फ्री फायर मध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकी चे जयहरी शिंदे,संकेत काहूरके, ओम भाकरे,संस्कार ढोले प्रथम, श्री शिवाजी अभियांत्रिकी चे विरेंद्र फिरके ,प्रथमेश चुटे, सईद शेख,कुणाल दांडगे द्वितीय,गुगलर मध्ये महाविद्यालयीन फेरी मध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकी ची निधी भट्टड, माहेरबानु महा. ची सानिका सपकाळ,श्री शिवाजी अभियांत्रिकी चां सुमित झपार्डे यांनी प्रथम,द्वितीय ,तृतीय येण्याचा बहुमान पटकावला.
शालेय फेरीत उज्ज्वल स्कूल ची ईश्वरी काळपांडे, न्यू इरा कॉन्व्हेन्ट ची मृणाल कांबळे , जिजाऊ कन्या विद्यालयाची तानिया शुक्ला प्रथम द्वितीय तृतीय आले. समन्वयक फेरीत श्री दिशांत आखरे ला प्रथम पुरस्कार, स्किल बस्टर ग्रामर ब्लीट्झ,स्पीड ऐस, ग्रूप डिस्कशन मध्ये बतूल अब्बास,जय सातारकर,गौरी इंगळे( दोन स्पर्धेत),खुशी छबीले, आफ्रिन सुलताना, मारिया गांधी यांना बक्षीस वितरित करण्यात आले.
मूवी मेनिया मध्ये शिवम वानखडे ,नितेश वानखडे, प्रणव टेकाडे प्रथम,प्रथमेश ढोरे,प्रज्वल फाले,संकेत छबीले द्वितीय, तन्मय जगताप तृतीय बक्षीस देण्यात आले.शालेय विद्यार्थ्यां साठी आयोजित Q - fista मध्ये जवाहर नवोदय चे वरद खाते ,वैभव तेलरांधे, अमरदीप डाखोरे प्रथम, पोदार स्कूल चे ध्रुव छावछरीया, वेदांत शर्मा, पलक रामराखणी द्वितीय तर राजेश्वर कॉन्व्हेन्ट चे रेवती देशपांडे, प्रवर्ष टाले,सतेज शिरसाट तृतीय , विशेष पुरस्कार मध्ये प्रभात चे मीत गोडा,नोयल चे लावण्य ठाकरे, ज्युबली चे कौशल भेदोत बक्षिसाचे मानकरी ठरले. म्युझिकल बँड चा ही कार्यक्रम या दरम्यान घेण्यात आला.प्रा.मंगेश शेगोकर, प्रा.प्रिया तायडे,प्रा.कल्याणी गावंडे,प्रा.किरण शेगोकर, प्रा.अनिता जवरे, प्रा.वासंती गौड,प्रा.कल्याणी बारबदे ,प्रा. ऋतुजा देशमुख,प्रा कल्पना गिल्डा,प्रा चेतना माते,यांनी विविध इव्हेंट समन्वयक पदभार सांभाळला.श्री भोयर,नितीन खडे,श्री घेबड व टीम,श्री कोठाळे ,श्री अमोल खेडकर,श्री गेडाम,श्री प्रज्वल तायडे,श्री धीरज व सर्वच विद्यार्थी प्रतिनिधीनी परिश्रम घेतले. डॉ मंदार देशमुख,प्रा. स्वप्नील बोबडे, डॉ आर . एस.जयस्वाल, डॉ त्रिपाठी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम आयोजनास श्री शिवाजी शिक्षण संस्थे चे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख ,कार्यकारिणी सदस्य (अमरावती ) तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती चे मार्गदर्शन लाभले.डॉ संदीप अवचार यांनी आभार प्रदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या