मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

खा. अनुप धोत्रे लोकसभेत गरजले

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_1.html 



नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करा 


अकोला : नागपूर मुंबई दरम्यान प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागपूर अकोला मुंबई मार्गावरील रेल्वे यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या व त्यांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी

नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी आज लोकसभेत लावून धरली. 

अकोल्यातील युवा खासदाराच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने संपूर्ण लोकसभेचे लक्ष वेधून घेतले. 

भारतीय रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने अमृत भारत योजना 2.0 अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आज लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदार धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.


गतिशक्ती टर्मिनल मंजूर


 अकोला रेल्वे स्थानकासाठी गतिशक्ती टर्मिनल मंजूर केल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. गतिशक्ती टर्मिनलमुळे आधुनिक व तत्पर रेल्वे सेवा उपलब्ध होऊन आर्थिक विकासालाही गती मिळेल. हा दूरदृष्टीचा निर्णय घेतल्यामुळे अकोल्याच्या आणि प्रामुख्याने विदर्भाच्या प्रगतीस हातभार लागणार आहे.

टिप्पण्या