मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे बलिदान दिवस संपन्न

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_42.html 



अकोला - ११ मार्च १६८९ रोजी पन्हाळगडावरून औरंगजेबाने त्यांची निघृण हत्या केली, परंतु त्यांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्याचा विजय अधिक सशक्त केला. “त्याग, निष्ठा आणि पराक्रम यांचा अमर संदेश देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त डाबकी रोड येथे कार्यक्रम घेण्यात आला.

   यावेळी आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराज यांचा 11 मार्च हा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो कारण हाच दिवस आहे ज्या दिवशी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पंधरवड्याहून अधिक काळ मुघल राजा औरंगजेबाने दिलेल्या भयंकर यातना सहन करून स्वराज्य स्थापनेसाठी प्राणाची आहुती दिली अशी माहिती आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन उमेश जानोरकर यांनी केले होते. कार्यक्रमाला डॉ अशोक ओळंबे, प्रकाशभाऊ फाटे, शशिकांत चोपडे, उमेश जानोरकर, अनिकेत गांगलवार, मनोज ढोले, नारायण रत्नपारखी, विकी मेहरे, राम भारती, बल्लू पजई, अमित भिरड, शुभम टोम्पे, विकी दुर्गीया, निखिल इंगळे, ए एस मोटर्स संचालक मिश्राजी यांचेसह डाबकी रोड येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या