मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

आमदार सावरकर यांनी अकोला बस स्थानकावरील प्रवाशांसोबत साधला संवाद

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post.html 


अकोला : आज अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी मध्यवर्ती बस स्थानकाला भेट देऊन प्रवाशांसोबत संवाद साधला. एसटीचे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी लवकरच आपण परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातून विविध तीर्थस्थळावर जाण्यासाठी नवीन गाड्यांची गरज आहे. तसेच शेगाव, तेल्हारा व लांब पल्ल्याच्या मार्गावर नवीन गाड्यांची तरतूद करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे ते म्हणाले.



बसस्थानकामधील पाण्याची समस्या, बांधकाम व त्या बांधकामामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लवकरच बॅटरीवर धावणाऱ्या बसेस येणार आहेत. त्या संदर्भात बॅटरी चार्जिंग सेंटर उभारण्याची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. तब्बल दोन तास आमदार सावरकर यांनी 

एसटीचे अधिकारी कर्मचारी व प्रवाशांसोबत संवाद साधला. सावरकर यांनी अचानक झाडाझडती घेतल्याने एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.



यावेळी त्यांच्यासोबत विजय अग्रवाल, जय तमसने, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड प्रशांत अवचार , विवेक भरणे, अजय शर्मा ,जानवी डोंगरे, सारिका जयस्वाल ,संतोष पांडे संदीप गावंडे, टोलू जयस्वाल पवन महल्ले, विकी ठाकूर, सागर शेगोकार एडवोकेट यशवंत दांदळे,रमेशकरीहार प्रकाश ,धोगली या, निकिता देशमुख, संतोष डोंगरे, गणेश अंधारे, राहुल देशमुख, मनोज शाहू, चंदा ठाकूर, विठ्ठल गावंडे विठ्ठल देशमुख, शंकर कपले, राहुल मुरारका, आरती धोगलीया, अर्चना चौधरी, टोनी जयराज, नितीन राऊत, निलेश निनोरे, अंबादास उमाळे राजेश बेले, विपुल घोगरे किशोर कुचके, गणेश तायडे, पंकज वाडी वाले, रेणुका शहाणे, पदाधिकारी सह एसटी महामंडळाचे विभुते, एसटी महामंडळ डेपो तसेच बांधकाम अभियंता उपस्थित होते.

टिप्पण्या