मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिवस उत्साहात

 


अकोला : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रंथालय व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. थोरात होते. थोरात यांनी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापकांनीही प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली. प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती शेगोकार, क्रीडा संचालक प्रा. नरेंद्र बुजरूक, डॉ. रश्मी टाले,ग्रंथालय प्रमुख श्री. सी. आर.देशमुख, डॉ. जी. एस.झांबरे, डॉ. एस. सी. मकवाना, आर्किटेक्ट सुधीर ढोमणे उपस्थित होते. याप्रसंगी मराठीतील ग्रंथ, कादंबऱ्या याचे प्रदर्शन भरविण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील पुस्तके वाचण्यासाठी आवाहन करण्यात आले.



 प्राचार्यांनी बोलताना आपल्या जीवनातील मराठी भाषेतील महत्त्व व त्याचा वापर करण्याची गरज याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा संचालकांनी संचलन करून मराठी भाषा बोलण्याबद्दल प्रतिज्ञा ही सादर केली.त्याचबरोबर निखिल जुनघरे या विद्यार्थ्याने मराठी भाषेतील गोडवा व तिचे महत्त्व विशद करताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे सांगितले.

 याप्रसंगी प्रा. ए. एस. गावंडे, डॉ. एस. पी. ढोमणे, सौ. वर्षा देशमुख, कु. वैशाली कातखेडे, सौ. वैराळे, श्री.शेळके इत्यादी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये रा. से. यो.चे स्वयंसेवक आयुष देशमुख, कु. भेंडे कु. इशिका गुजर, जानवी वाकोडे, वैष्णवी धनोकार, मानसी बढे इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर स्नेहल देशमुख, ऋषिकेश देविकार,आयुष श्रीवास आणि बरेच विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या