व्हॉईस ऑफ मीडिया अकोला जिल्हा कार्यकारिणी जाहीर

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://tumchyasathich.blogspot.com/2025/01/blog-post_8.html  




जिल्हाध्यक्ष विनय टोले, उपाध्यक्ष विशाल पुरंदरे


अकोला : आद्य पत्रकार तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज मराठी पत्रकारदिन म्हणून अकोला (AKOLA) जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने साजरा करण्यात आला.

यावेळी प्रख्यात अ‍ॅर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रणय लड्ढा यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ पत्रकार विनय टोले यांची अकोला जिल्हाध्यक्ष पदावर तर विशाल पुरंदरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनय टोले होते तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार विजय केंदरकर यांची लाभली होती. विष्णू गावंडे, विदर्भ उपाध्यक्ष विमल जैन प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संदीप, चव्हाण, राज्य कार्यकारिणीचे सचिव प्रसाद कानेटकर उपस्थित होते. सर्कीट हाऊस (circuit house) येथे आयोजित या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तद्नंतर व्हॉईस ऑफ मीडिया (voice of media) अकोला जिल्हा व शहर नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणी :

विनय टोले-अध्यक्ष, विजय केंदरकर -कार्याध्यक्ष, रुबेन वाळके- कार्याध्यक्ष, विशाल पुरंदरे उपाध्यक्ष, प्रमोद मोहरील-उपाध्यक्ष,

मुकुंद कोरडे- कोषाध्यक्ष, संतोष जुमळे-संघटक, श्याम ठक- सचिव, समीर ठाकूर-सह सचिव व विधी न्याय सल्लागार, गणेश हिरोळकर-जनसंपर्क अधिकारी, समीर मोकासदार-सदस्य, नरेंद्र गारोळे-सदस्य, अ‍ॅड. अमर तिवारी-सदस्य, पद्माकर उमाळे-सदस्य, संजय सोनार- सदस्य, मुकेश ढोेके-सदस्य, उमेश अलोने- मार्गदर्शक, धनंजय साबळे-मार्गदर्शक, पुरुषोत्तम ढोले-मार्गदर्शक, वर्षा मोरे-सदस्य, अनुप टाले-जिल्हा कार्यकारिणी सक्रीय सदस्य, सुशांत शहा-सदस्य.

शहर कार्यकारिणी

 विष्णु गावंडे- शहराध्यक्ष, दिपक गवई-उपाध्यक्ष, विलास देशमुख-सचिव, अनिल दंदी-पीआरओ, शरद शेगोकार- सहसचिव, प्रचारक ओळंबे-प्रचारक, श्रीकांत राऊत- संघटक, राजू क्षीरसागर-सदस्य, गजानन लोणकर-सदस्य, विक्रम मदने-सदस्य, राम जुमडे-सदस्य, अनंता शिंदे-सदस्य, सिद्धार्थ वाहुरवाघ-सदस्य. या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक संतोष जुमळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास देशमुख यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)