उद्योगपती जसपाल सिंग नागरा यांच्या हस्ते पत्रकार विशाल पुरंदरे व विशाल राजे बोरे यांचा सत्कार

VISHAL PURANDARE
By -
2 minute read
0

 


परिवर्तन युवक संघटनेतर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन


अकोला : व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विशाल पुरंदरे व रोखठोक लेखनासाठी पत्रकार विशाल राजे बोरे यांचा उद्योगपती जसपाल सिंग नागरा यांच्या हस्ते आज स्थानिक शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.



विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याची परिवर्तन युवक संघटनेचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची संकल्पना होती. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती तथा हॉटेल जसनागराचे मालक जसपाल सिंग नागरा लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक मुकुंद भारसाकळे उपस्थित होते. यावेळी बोलताना जसपाल सिंग नागरा यांनी अकोल्यातील पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे संतुलित आहार घेतल्याने कोणताही असाध्य आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे देखील पटवून दिले. प्राध्यापक मुकुंद भारसाकळे यांनीही समाजातील विविध घटकांचा विकास होणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. रामकृष्ण डोंगरे यांनी संत गाडगेबाबा फिरते आरोग्य सेवा अभियानाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना अकोल्यातील तज्ञ डॉक्टरांची सेवा व मोफत औषधी उपलब्ध करून दिली. संत गाडगेबाबा यांच्या विचाराला समर्पित होऊन केलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. आज परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, वाणिज्य, विज्ञान, व देश सेवेसाठी समर्पित सैनिकांनी केलेल्या कार्याबद्दल प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी अविनाश देशमुख, प्रा. प्रदीप चोरे, डॉ. पूजा खेतान, प्रमोद मुरूमकर, प्रवीण वाहुरवाघ, संजय दुर्दैव, इंगळे सर, माजी सैनिक विष्णू डोंगरे, सचिन साठे, डॉ. मनोहर घुगे, प्रा. शत्रुघन बिडकर, प्रा. अविनाश राठोड, गोवर्धन मोरे, पत्रकार देवानंद गहिले, सेवानिवृत्त पीएसआय श्री सानप, मांडवकर, अशोक गडेकर, कमलजीत कौर, आनंद इंगळे, अनिल शिंदे, आकाश शिरसाठ, प्रमोद धर्माळे, रोहिणी गायकवाड, रामदास लोखंडे, सागर धनोरीकर, नितेश पवार, श्रीकांत भैय्या, शाकीर खान, प्रमोद गवई, नासिर खान, दीपक चौधरी, आकाश डोंगरे, अब्दुल रहमान, मोहन तायडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतीताई वानखडे यांनी तर प्रास्ताविक डॉ. रामकृष्ण डोंगरे केले. आभार प्रदर्शन राजेश अवचार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)