मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

कराटे स्पर्धेत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_52.html  



अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा 2024-25 वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे आयोजित करण्यात आली होती.


 या स्पर्धेत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. 

स्पर्धेमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खेळाडू सहभागी झाले होते. 


यात श्री शिवाजी कनिष्ठ अकोला ची क्रीडापटू अवंतिका दिनेश घाटे, सोहन नितेश निकाळजे, राघव रणजित वाघ हे खेळाडू सहभागी झाले.


 यांनी आपल्या वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक प्राप्त केले. या सर्व खेळाडूंची निवड विभाग स्तरावर झालेली आहे.

या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते (प्रबंधक) प्रा संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख) प्रा सुशिला मळसणे (कनिष्ठ विभाग प्रमुख) प्रा नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या