रायफल शूटिंग स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_61.html 


या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला








अकोला : जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा छत्रपती शूटिंग रेंज, अकोला येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे कु.सानिका वाडेकर, श्रुती बढे, जान्हवी मेश्राम,साहिल ठोसरे यांनी स्पर्धा जिंकून शिवाजी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

कु.सानिका ओम प्रकाश वाडेकर हिने पिप साईट मध्ये 393 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.

 कु.श्रुती गणेश बढे आणि कु. जान्हवी जगदीश मेश्राम यांनी ओपन साईट मध्ये 347 ,317 गुण घेऊन अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. 

मुलांमध्ये साहिल धम्मपाल ठोसरे पिप साईट मध्ये 208 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.

या खेळाडुंना क्रीडा शिक्षक प्रा नितीन वाघमारे, श्री विसेन्ट आमेर (शूटिंग कोच) यांचे मार्गदर्शन लाभले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते (प्रबंधक) प्रा सुशिला मळसणे( कनिष्ठ विभाग प्रमुख),प्रा संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)