मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अकोला शहराच्या पाणीटंचाई निवारणासाठी १३२.११ कोटींचा विशेष निधी

अकोला शहराच्या पाणीटंचाई निवारणासाठी राज्य सरकारने १३२.११ कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार ६ नोव्हेंबर २०२६ रोजी या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. निधीचे स्वरूप  मोर्णा धरण ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी रु. ८७.६७ कोटी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा व वितरण व्यवस्थेसाठी रु. ४४.४४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.  पाणीटंचाईचे कारण  काटेपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा अपुरा असल्याने जानेवारी २०२७ अखेरीस पाणी संपण्याची शक्यता होती आणि शहरात १० दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. फायदा  या नवीन जलवाहिनीच्या कामामुळे आणि निधीमुळे अकोला शहरवासीयांची गंभीर पाणीटंचाईच्या संकटातून सुटका होणार आहे


आमदार रणधीर सावरकर यांच्या  संकल्पनेतून सुरू झालेले 'मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते अभियान' शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक - ना. बावनकुळे




अकोला : आमदार रणधीर सावरकर यांच्या 'महाराष्ट्र पॅटर्न'च्या संकल्पनेतून सुरू झालेले 'मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते अभियान' शेतकऱ्यांसाठी  दिशादर्शक ठरणार आहे, असे मनोगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्त्यांचे भूमिपूजन आणि 'नाम फाउंडेशन'च्या वतीने जलसंधारण कामांचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला, यावेळी ते बोलत होते.


नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर होते. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की येत्या ५ वर्षांत राज्यात १ लाख किलोमीटर पांदण रस्ते करण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच, अकोलेकरांना पाणीटंचाई भासू दिली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


​आमदार रणधीर सावरकर यांनी मनोगतात सांगितले की, शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर झाल्यास उत्पादन नक्कीच वाढेल. जलसंधारणाच्या कामांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनीही दुष्काळमुक्तीसाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.


​या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक आर्चित चांडक, नाम फाउंडेशनचे राजेंद्र शेळके यांच्यासह विविध मान्यवर आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या