लोकतंत्र बचाओ - अराजकता हटाओ पदयात्रा : अकोला जिल्ह्यातून 5000 कार्यकर्ते सहभागी होणार

अकोला : देशभरात काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पायमल्ली करून पदोपदी अपमान करत आहेत. न्यायालय, ईडी, सीबीआई, निवडणूक आयोग यांच्यावर कोणताही पुरावा नसताना अविश्वास व्यक्त करून केवळ राजकीय स्वार्थासाठी वाटचाल सुरू असल्याचा भाजपचा आरोप आहे.
राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी सातत्याने घटनात्मक संस्थांचा अपमान करतात, न्यायालयाची माफी मागतात, एसआयआर प्रक्रियेत सहभाग न घेता ज्यांची नावे वगळली त्याबाबत कोणताही पुरावा देत नाहीत. त्यांच्या काळात झालेला एसआयआर योग्य होता आणि आता अयोग्य कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून देशाच्या राजकारणात आणि गेल्या 25 वर्षांपासून जनतेचा विश्वास संपादन करून काम करत आहेत. भाजप आणि मित्र पक्षांचे लोकप्रतिनिधी सातत्याने जनतेचा विश्वास जिंकत असताना राहुल गांधी विदेशी तत्वांच्या इशाऱ्यावर देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर जनतेचा विश्वास आणि पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असल्याचे दाखविण्यासाठी देशभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही बचाव, संविधान बचाव पदयात्रा काढण्यात येत आहे.
नागपूर येथील मुख्य पदयात्रा :
दिनांक : 5 नोव्हेंबर, गुरुवार
वेळ : दुपारी 3.00 वाजता
स्थळ : यशवंत स्टेडियम ते मानस चौक, नागपूर
नेतृत्व : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
या पदयात्रेत अकोला जिल्ह्यातून सुमारे 5000 कार्यकर्ते सहभागी होणार असून सकाळी 10.00 वाजता अकोल्यातून रवाना होणार आहेत.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा