अकोल्यात इंडिया महाविकास आघाडीचे ज्ञानेशकुमार विरोधात जोरदार आंदोलन
अकोला : दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर अकोल्यातही इंडिया महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी, नारेबाजी करून ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी करण्यात आली.
स्थानिक शहीद मदनलाल धिंग्रा चौकामध्ये आंदोलन सुरू होण्यापूर्वी इंडिया महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन स्वराज्य भवन येथून रॅली काढली. चौकामध्ये आल्यानंतर 'ज्ञानेश कुमार हटाव देश बचाव' अशा घोषणा देऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी संविधानाच्या अनुच्छेद 326 चे सामूहिक वाचन करण्यात आले. या अनुच्छेदामध्ये प्रत्येक मतदाराचा अधिकार समाविष्ट असून या अनुच्छेदाला धक्का लावण्याचे काम ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी व अमित शहा करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. साजिद खान पठाण, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश तायडे, महानगराध्यक्ष महेंद्र गवई यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार बबनराव चौधरी, महेश गणगणे, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, निखिलेश दिवेकर, विजय देशमुख उगवेकर, माजी आमदार हरिदास भदे, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार,शहर प्रमुख आशिष गावंडे, अभय खुमकर, सुरेंद्र विसपुते, चंदू तिवारी, राजूभाऊ वरोकार, गजानन चौधरी, विकी इंगळे, गजानन फोनकर, अश्विन कपले, आप पार्टीचे जिल्हा अध्यक्ष कैलास प्रांजळे, शहर अध्यक्ष मकसूद भाई, राष्ट्रवादीचे मोहम्मद युसूफ भाई, महमूद पठाण, मनसेचे पंकज साबळे, सौरभ भगत, रंजीत राठोड, प्रदीप मस्तूद, समाजवादी पार्टीचे इब्राहिम खालिद, काँग्रेसचे विजय तिवारी, मनीष मिश्रा, मो. इरफान, नगरसेवक मोईन खान, नगरसेवक तश्वर पटेल, प्रशांत प्रधान, गुड्डू पठाण, नगरसेवक मोहीम खान, नगरसेवक नावेद गवळी, नगरसेवक फिरोज आलियार खान, नगरसेवक हरीश कटारिया, रवी पाटणे, कशिश खान, यशोदाताई गायकवाड, किशोर अरुढकर, शुभम गोळे, सुनील चंदनबटवे, अतुल मानकर, दीपक गवई, प्रशांत वानखडे, राजकुमार वानखडे, मो. शकील शेख, अतुल खोटरे, स्वप्निल पाठक, श्रीकांत सरोदे, यसीन ऊर्फ बब्बू भाई, योगेश थोरात, राधे पेठकर, विजय पचारे, रवी पाटणे, शेख जाकीर, सै. जफर, सै. हसन, नगरसेवक सुनील वानखडे, संदेश वानखडे, योगेश शिराळे, पंकज काठोळे, हर्षित कांबळे, सोनू याकूफ खान, विशाल इंगळे, गणेश ताले, गौसिया खान यांच्यासह इंडिया महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा