वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेतकऱ्यांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी आमदार सावरकर महावितरण कार्यालयात !
अकोला : घुसर व उगवा परिसरातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक लाईन संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार श्री. रणधीर सावरकर यांनी स्वतः महावितरण (MSEB) कार्यालयात जाऊन अधिकारी आणि शेतकऱ्यांची समोरासमोर बैठक घेऊन अनेक अडचणी जागीच सोडविल्या. यावेळी उगवा व घुसर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरडा दुष्काळ असल्यामुळे शेतकरी आधीच हतबल असून ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच शहरातील कोणत्याही नागरिकाला त्रास होता कामा नये, अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तांत्रिक बाबी त्वरित सोडवण्याचे निर्देश देऊन अभियंता व उपअभियंता यांनी तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर केला व त्या भागातील समस्या निकाली काढली. उर्वरित अडचणीही लवकरच सोडवण्याचे अभिवचन अधिकाऱ्यांनी दिले.
शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा रोखठोक इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
शेतकऱ्यांना नऊ कोटी अनुदानाचे वाटप, प्रकल्पग्रस्तांसाठी सुवर्ण दिवस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
10 मार्चला अमरावतीत प्रकल्पग्रस्तांचा महाएल्गार मोर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा