मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

शेतकऱ्यांना कोणी त्रास दिला तर सहन करणार नाही - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोला : येथे आज राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येणार आहे. परंतु या काळात शेतकऱ्यांना कोणी त्रास दिला, तर तो कदापि सहन केला जाणार नाही. संपूर्ण यंत्रणा बळीराजाच्या पाठीशी उभी आहे.  अकोला येथे त्यांनी शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. एकूण 427 शेतकऱ्यांची निवेदने त्यांनी स्वीकारून त्यांच्या वैयक्तिक समस्या, अपेक्षा आणि भावना ऐकून घेतल्या. सावकारी, पाणीटंचाई, कर्ज आणि इतर विविध विषयांवर शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. शेतकऱ्यांच्या या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने मदत देण्यात येईल, हे सरकार शेतकऱ्यांचेच आहे, असेही त्यांनी सांगितले. यानंतर नामदार बावनकुळे यांनी येवता येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल यांच्या शेतात पाहणी केली. शेख रजू शेख रश...

 स्वातंत्र्यदिनाला शेकडो नागरिकांनी घेतली व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा




अकोला : स्थानिक शिवसेना वसाहत येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात येऊन ध्वजारोहन करण्यात आले.

 राष्ट्र गीतांनंतर शेकडो नागरिकांना 10 करोड नशा मुक्त अभियान अंतर्गत व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय, मेडिकल विंगच्या माध्यमातून वैशाली दीदीच्या मार्गदर्शनात देण्यात आली.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आपला माणूस डॉ अशोक ओळंबे होते. प्रमुख अतिथी वैशाली दीदी, आरती दीदी,गजानन गोलाईत डॉ संजय ढोरे, रवी पोलाखडे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश पोलाखडे, संचालन सागर पोलाखडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक गणेश पोलाखडे यांनी केले होते. व्यसनाधीन झालेल्या नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून ठीक ठिकाणी शपथ देण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. 15 ऑगस्ट चे औचित्य साधून स्थानिक शिवसेना वसाहत येथे वैशाली दिदी यांचे मार्गदर्शनात 10 करोड नशा मुक्त अभियान अंतर्गत शेकडो नागरिकांना प्रतिज्ञा देण्यात आली.यावेळी वैशाली दीदी, आरती दीदी, डॉ अशोक ओळंबे पाटील, गणेश पोलाखडे,  रवी पोलाखडे, गजानन गोलाईत मंचवार उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सागर पोलाखडे, सागर खरोटे, रवींद्र पोलाखडे, विकास पोलाखडे, शिवांश मुरकर, सुरेश अग्रवाल, संतोष भटकर, ओम पोलाखडे, रामकृष्ण भटकर, अमोल पोलाखडे, रामकृष्ण उमक ,सुनंदा राऊत, योगेश घाडगे, स्वराज मंडले, सचिन मंडले, युग पोलाखडे, मंगेश पटोकार, रामदास गमे गणेश अनासने मयूर सुलताने शुभम गीते धनराज भूलखळे आशुतोष तिवारी दत्ता  बावस्कर अनिकेत तांबट मधुकर सोनारग प्रणित रत्नपारखी संदीप पोलाखडे शोभा गाडगे मीरा मुरकर सीमा अग्रवाल शालू मुंडे सुनीता इंगळे कौशल्या भाकरे लक्ष्मी पवार रेणुका राऊत सुनंदा बोर्डे रेणुका वानखडे यांचेसह शिवसेना वसाहत येथील नगरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पण्या