मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसच्या अकोला थांब्याला १ वर्ष पूर्ण
(विशाल पुरंदरे)
अकोला, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व अकोलेकर प्रवाशांच्या आग्रही मागणीमुळे मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोला जंक्शन येथे ऐतिहासिक थांबा मिळाला होता.
२८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झालेल्या या प्रतिष्ठित दुरांतो एक्सप्रेसला तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोला येथे थांबा मिळाला असून, आज या थांब्याला १ वर्ष पूर्ण होत आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्ड यांचे तसेच या थांब्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार अनुप धोत्रे यांचे अकोलेकर प्रवाशांनी आभार मानले आहे.
खासदार अनुप धोत्रे हे अकोला रेल्वे विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबतही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा