मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

 ---


बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात

आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी




अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.


या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




आमदार सावरकर म्हणाले  

"अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे."


"एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि मागण्याही समजून घेतल्या आहेत. लवकरच येथील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.


बोरगाव मंजू व परिसरातील नागरिकांना या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार असून आमदार सावरकर यांनी दिलेले अभिवचन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

टिप्पण्या