वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
समाजसेवेचा वारसा जोपासणारे
मा. नगरसेवक गोपी ठाकरे
अकोला शहरातील माजी नगरसेवक गोपी ठाकरे या नावाला स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी ही ओळख स्वतःच्या कर्तुत्वाने निर्माण केली आहे. समाजसेवेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला.
स्व. सुखदेवरावजी ठाकरे व स्वर्गीय नारायणरावजी गि-हे हे त्यांचे आजोबा. तसेच मरणोत्तर देहदानाचा संकल्प सर्वप्रथम करून पूर्णत्वास नेणाऱ्या स्वर्गीय हिराबाई या त्यांच्या मातोश्री. आई वडील आजी आजोबा यांच्या गोष्टी ऐकून बालपणीपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.
कोणतीही अडचण असो, गोपी भाऊ कडे गेले म्हणजे नक्की काम होणार असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला. पुढे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम सुरू केले.
आजपर्यंत त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध पदे भूषविली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, नगरसेवक, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, अकोला महानगरपालिकेचे गटनेता, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव, स्थायी समिती सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, गोरक्षण रोड विकास समितीचे अध्यक्ष, डायमंड मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष, जगदंबा मंदिर ट्रस्ट गोरक्षण रोड अकोला चे सदस्य, 1986 पासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत 1995 ते 99 सेना-भाजप युतीच्या शासन काळात अपक्ष मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या सोबत राहून जनसामान्यांचे प्रश्न सोडविले. 1999 ते 2004 मध्ये भाजप अकोला जिल्हा युतीचे कार्य केले. 2004 ते 2007 अकोला जिल्हा भाजपचे सचिव पदी नियुक्ती. 2007 मध्ये सविता गोपी ठाकरे भाजपच्या तिकिटावर महिला उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने वार्ड 45 मधून निवडून आल्या. 2008 मध्ये ओबीसी प्रवर्गात सौ सविता गोपी ठाकरे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून अविरोध निवड झाली. 2010 मध्ये सौ सविता गोपी ठाकरे यांचे स्थायी समिती सदस्य पदी वर्णी लागली. 16 फेब्रुवारी 2012 मध्ये गोपी ठाकरे ओबीसी प्रवर्गातून अपक्ष नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी निवडून आले. ऑगस्ट 2012 मध्ये स्थायी समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 2014 मध्ये पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समिती निमंत्रक सदस्य म्हणून शिफारस केली.
आज गोपी ठाकरे नगरसेवक नसले तरी कुणाचेही काम करण्यासाठी तत्पर असतात. गोपी ठाकरे यांनी प्रज्वलित केलेला समाजसेवेचा दिवा असाच तेवत राहणार आहे.
https://youtube.com/@mandirtemple-b5i?si=sVXK2RFshXAmkitn
( टीप : हा लेख लिहिण्यासाठी गोपी ठाकरे चित्रमय आलेख या पुस्तकातून संदर्भ घेण्यात आला आहे)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी महाविद्यालयात गेस्ट लेक्चर संपन्न
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा