मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

                         मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसच्या अकोला थांब्याला १ वर्ष पूर्ण                   (विशाल पुरंदरे) अकोला, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व अकोलेकर प्रवाशांच्या आग्रही मागणीमुळे मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोला जंक्शन येथे ऐतिहासिक थांबा मिळाला होता. २८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झालेल्या या प्रतिष्ठित दुरांतो एक्सप्रेसला तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोला येथे थांबा मिळाला असून, आज या थांब्याला १ वर्ष पूर्ण होत आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्ड यांचे तसेच या थांब्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार अनुप धोत्रे यांचे अकोलेकर प्रवाशांनी आभार मानले आहे. खासदार अनुप धोत्रे हे अकोला रेल्वे विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबतही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

चंदाताई शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या सचिव पदी निवड

 



अकोला : महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या सचिवपदी अकोलाच्या नगरसेविका सौ. चंदाताई शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा आमदार व प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी केली.


प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस, संघटन उपाध्यक्ष श्री. उपेंद्र कोठेकर, विधिमंडळ प्रतोद आमदार श्री. रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. संजय कुटे, खासदार श्री. अनुप धोत्रे, पालकमंत्री अॅड. श्री. आकाश फुंडकर, श्री. विजय अग्रवाल, श्री. संतोष शिवरकर, श्री. जयंत मसने यांच्याशी चर्चा करून चंदाताई शर्मा यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


दोन वेळा महानगर अध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक


चंदाताई शर्मा यांनी यापूर्वी दोन वेळा भाजपा महिला मोर्चा महानगर अध्यक्ष म्हणून पद भूषवले आहे. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्या सातत्याने अग्रेसर राहिल्या आहेत. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.


पक्ष विस्ताराला मिळणार चालना  


चंदाताई शर्मा यांच्या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा महिला आघाडीच्या संघटनात्मक कामाला गती मिळणार आहे.


अभिनंदन  


या निवडीबद्दल भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. वैशालीताई शेळके, महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


श्रेय

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना चंदाताई शर्मा यांनी या यशाचे श्रेय जिल्हा नेतृत्व, महिला आघाडीच्या नेत्या सौ. सुहासिनीताई धोत्रे, श्रीमती गंगादेवी शर्मा, सौ. मंजुषाताई सावरकर व सर्व सहकाऱ्यांना दिले आहे.


टिप्पण्या