वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आत्मा' शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी किशोर काकडे
अकोला : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत अकोला तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण सभा १ जुलै २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,अकोला येथे संपन्न झाली. सर्व सदस्यांच्या सहमतीने किशोर काकडे (रा. डोंगरगांव ) यांची शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर होते. याप्रसंगी नवनियुक्त सदस्यांचे कृषी विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सभेचे मुख्य उद्दिष्ट नवनियुक्त सदस्यांना आत्मा योजनेच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे आणि आगामी वर्षातील कृषी उपक्रमांचे नियोजन करणे हे होते.सभेच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर,तालुका तंत्रज्ञान अधिकारी व्ही.एम.शेगोकार आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ.अर्चना पेठे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांना 'आत्मा' अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,त्यांचे स्वरूप आणि उद्दिष्टे याविषयी अत्यंत सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले.
सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या आत्मा कृती आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये सध्या तालुक्यात सुरू असलेल्या नैसर्गिक शेतीशाळा,कृषी पीक प्रात्याक्षिके,आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या अभ्यास दौरा नियोजनाबाबत सर्व सदस्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या नवीन अध्यक्षांची निवड प्रक्रिया होती. उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांच्या एकमताने व सहमतीने किशोर काकडे (रा. डोंगरगांव ) यांची कृषी विभाग अकोला तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निवडीचे स्वागत केले.
नवनियुक्त अध्यक्ष किशोर काकडे यांनी भाषणात अकोला पूर्वचे कर्तव्यदक्ष व अभ्यासु आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी विश्वासाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली त्यानुसार अकोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचण्यावर भर राहील असे सांगितले.या प्रसंगी उपस्थित संतोष शिवरकर, अंबादास उमाळे, जयंत मसने,मनिष गावंडे,माधव मानकर, गिरीश जोशी,राजेश नागमते, श्रावण इंगळे,प्रवीण हगवणे,प्रशांत ठाकरे, संजय कोरडे, विवेक भरणे,राजेश ठाकरे,महेंद्र काळे, राजेश बेले, जयकुमार ठोकळ, वैभव माहोरे, अंकुश इंगळे, विजय गावंडे, संतोष डोंगरे, श्रीकांत इंगळे, सतीश गावंडे,रवी गावंडे उमेश गावंडे,देवेंद्र देवर,संजय गावंडे, वसंत गावंडे, प्रकाश गावंडे, जगन्नाथ मुरूमकार, अनिल गावंडे, अमन महल्ले, लव पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते.कृषी विभागाच्या वतीने सभेला उपस्थित राहणाऱ्या सर्व सदस्यांना मार्गदर्शक सूचना पुस्तिका,पेन,नोटपॅड आणि फोल्डर देण्यात आले. आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी धर्मेंद्र राठोड यांनी केले. नवनियुक्त सदस्य बाबूलाल कागंटे, महेंद्र बढे, दीपक पाटील, सौ.लिलाबाई मोहरकार,विठ्ठलराव चतरकर, दीपक तायडे, सौ.शिल्पा साखरे, सौ.लिलाबाई कंटाळे,सुयोग दांदळे, दिनेश तराळे,विनय भटकर, सौ.रेणुका बोर्डे,आकाश थोरात,सुभाष टिकार,नंदकिशोर गावंडे, सौ.शुभांगी भटकर,सौ.सरिता वाकोडे,यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कृषी विभागाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.अकोला तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कृषी विभाग आणि नवनियुक्त समिती एकत्रितपणे प्रभावी कार्य करेल, या संकल्पाने सभेची सांगता झाली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी महाविद्यालयात गेस्ट लेक्चर संपन्न
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा