अकोला, दि 24 - श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे प्राचार्य डॅा रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे माजी विद्यार्थी मोहम्मद उझेर खान, उप-व्यवस्थापक, व्यापार वित्त आणि परकीय चलन विभाग, एस बँक, शाखा मुंबई यांच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अस्मीता बढे होत्या. याप्रसंगी विचारपिठावर वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संजय तिडके,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा एस एच मळसने, विज्ञान विभाग प्रमुख प्रा एस डी तराळे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते उझेर खान यांनी सांगितले की,माझ्या सारखा एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर शिखर बॅंक असणाऱ्या बॅंकेत उप-व्यवस्थापक होवु शकतो तर तुम्ही देखील मोठ्या पदावर जावु शकता त्यासाठी मात्र गरज आहे प्रचंड मेहनत, सातत्य आणी अभ्यासाची.स्वत:चा जीवन संघर्ष त्यांनी मांडला तेव्हा एक एक प्रसंग सिनेमा सारखा वाटत होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आजचे विद्यार्थी हे उद्याचे उद्योजक, आर्थिक सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट आणि व्यवस्थापक आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करा शिक्षणचं तुमच्या जीवनाची दिशा ठरवु शकते.
अध्यक्षीय भाषणात डॅा अस्मीता बढे यांनी सांगीतले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे ओझे म्हणुन न पाहता एक आव्हान म्हणून बघायला हवे, म्हणून चांगला अभ्यास करा आणी यशस्वी व्हा असे प्रतिपादन केले.
मान्यवरांनी समायोचीत भाषणे केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन प्रा सुनीता खेकाळे (भिसे) यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा नितीन नायसे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या