मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण करणार

 



अकोला : राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा "देवा भाऊ" ना. देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा दिवस 'जनकल्याण दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या उपक्रमाचे नेतृत्व भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यामध्ये खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अगरवाल माजी महापौर शारदाताई खेडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


नगराध्यक्षा सुलभाताई दुतोंडे, नगराध्यक्षा मायाताई धुळे, नगराध्यक्षा वैशालीताई शेंडे पालीवाल, हर्षद साबळे, तेजराव थोरात, किशोर पाटील, माधव मानकर, बळीराम सिरस्कार, अंबादास उमाळे, अमित कावरे, विवेक भरणे, राजेश बेले, मनीष गावंडे, रुपाली काकडे, योगेश गोतमारे, जयश्रीताई फुंडकर, वैशालीताई शेळके, वैशालीताई निकम, वैकुंठ ढोरे, उमेश पवार, श्रीकृष्ण चव्हाण, चंद्रकांत अंधारे, गणेश गाडगे, किशोर कुचके, नितीन लांडे, संकेत राठोड, गोपाल महल्ले, हरीश टावरी, अ‍ॅड. रूपाली काकडे, अ‍ॅड. देवाशिष काकड, आम्रपाली उपरवट, संजय गोटफोडे, अमोल गीते, तुषार भिरड, संजय कोरडे, विठ्ठल वाकोडे, मंगेश दुतोंडे, राजेंद्र गिरी, संदीप गावंडे, गोपाल मुळे, रणजीत खेडकर, प्रशांत ठाकरे, कपिल खरप, नंदकिशोर राऊत, हर्षल साबळे, गणेश लोड, प्रवीण हगवणे, किशोर मांगटे पाटील, डॉ. किशोर मालोकार, डॉ. अभय जैन, सिद्धार्थ शर्मा, अ‍ॅड. सुभाष सिंग ठाकूर, मनोहर राहणे, संदीप सोळंके, राजेश रावणकर, राजेश नागमते गिरीश जोशी, पवन महल्ले अमोल गोगे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.


जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांनी माहिती दिली की, जिल्ह्यातील 56 ठिकाणी खालील उपक्रम घेतले जाणार आहेत:  

रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, अन्नदान, स्वच्छता अभियान, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, सामूहिक हनुमान चालीसा पठण, जलाभिषेक, रुग्णांना फळ वाटप, सुंदरकांड पठण, शेतकऱ्यांचा सन्मान, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, एसटी स्मार्ट कार्ड शिबिर, एस.आर. विशेष शिबिर, विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांशी संवाद, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील 13 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज माफीची ऐतिहासिक घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कायदा दुरुस्ती व कारवाईचा निर्धार, आणि ग्रामीण पांदण रस्त्यांसाठी विशेष समिती स्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम सुरू केले आहे. 


मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त हार-तुरे, होर्डिंग, बॅनर, जाहिरात न करता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व सामाजिक, धार्मिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, असे आवाहनही जिल्हा भाजपातर्फे माधव मानकर यांनी केले आहे.

---

> देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्यात 'जनकल्याण दिवस'

> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा भाजपातर्फे 56 ठिकाणी सेवा उपक्रम  

> रक्तदान, आरोग्य शिबिर, अन्नदान, वृक्षारोपण, शेतकरी सन्मान  

> मार्गदर्शक: आ. रणधीर सावरकर | खा. अनुप धोत्रे | पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर  

> हार-तुरे ऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन

टिप्पण्या