मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

250 वर्षे प्राचीन जगन्नाथ मंदिरात अनसर पूजा सुरू, 15-16 जुलैला रथयात्रा उत्सव

  



अकोला, 4 जुलै 2026 : भगवान श्री जगन्नाथ जी यांची गुप्त पूजा व अनसर उत्सव सध्या सुरू आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठ परिसरातील अडीचशे वर्षे प्राचीन श्री जगन्नाथ जी, सुभद्रा जी व बलदेव जी मंदिरात वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रघोषात विशेष पूजा-अर्चना संपन्न होत आहे.


अनसर काळात भगवानांना ताप आल्याने त्यांच्या लवकर स्वस्थ होण्यासाठी शाल भेट देऊन विशेष प्रार्थना करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील सर्व धरणे भरून पिकांना पाणी मिळावे, शेतकरी सुखी व्हावा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी वेदपाठी ब्राह्मण हेमंत शर्मा, विजय दुबे, संतोष शुक्ला, जनक जोशी, वल्लभ शर्मा, राधेश्याम शर्मा, दिनेश शर्मा यांनी वेदमंत्रांनी पूजा केली. यावेळी गिरीश जोशी, रमाकांत भरकर, माधव मानकर, गिरीराज तिवारी, संजय जोशी, मनोहर मानकर, प्रशांत लोहिया, अजय जोशी, अजय गुल्हाने, नितीन ढोले आदी भाविक उपस्थित होते. डॉ. संजय शर्मा हे सुद्धा सहभागी झाले होते.




15-16 जुलैला रथयात्रा महोत्सव

  

दुबे परिवाराच्या वतीने माहिती देण्यात आली की, दि. 15 जुलै 2026 रोजी या मंदिर परिसरात रथयात्रा निमित्त विशेष पूजा-अर्चना व धार्मिक अनुष्ठान होणार आहे. दि. 16 जुलै 2026 रोजी भव्य रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अकोला पंचकोशीतील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येणार आहेत. रथयात्रेनिमित्त विशेष महाप्रसादाचे वितरण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


मंदिर विश्वस्त व दुबे परिवाराने सर्व भाविकांना रथयात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथजींचा आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या