मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

                         मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसच्या अकोला थांब्याला १ वर्ष पूर्ण                   (विशाल पुरंदरे) अकोला, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व अकोलेकर प्रवाशांच्या आग्रही मागणीमुळे मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोला जंक्शन येथे ऐतिहासिक थांबा मिळाला होता. २८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झालेल्या या प्रतिष्ठित दुरांतो एक्सप्रेसला तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोला येथे थांबा मिळाला असून, आज या थांब्याला १ वर्ष पूर्ण होत आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्ड यांचे तसेच या थांब्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार अनुप धोत्रे यांचे अकोलेकर प्रवाशांनी आभार मानले आहे. खासदार अनुप धोत्रे हे अकोला रेल्वे विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबतही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळ्यात 100 महिलांचा सत्कार

 


अकोला, दि. 22 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला भाजपा महिला मोर्चा तर्फे शेतातील, अंगणातील आणि छतावरील भाजीपाला लागवड करणाऱ्या महिलांचा `देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा` मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमाचा उद्देश महिलांना नैसर्गिक व विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे हा होता.

 


या कार्यक्रमात शेती, अंगण आणि छतावर भाजीपाला लागवड करणाऱ्या 100 पेक्षा जास्त कृषी माऊली भगिनींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सुहासिनीताई धोत्रे होत्या. यावेळी सौ.मंजुषाताई सावरकर, आमदार श्री. रणधीर भाऊ सावरकर, भाजपा महानगर अध्यक्ष श्री. जयंतराव मसने, सभापती श्री. विजयजी अग्रवाल, महापौर सौ. शारदाताई खेडकर, सौ. अर्चनाताई शर्मा, सौ. सीमाताई मांगटे-पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वैशालीताई शेळके, सौ. चंदाताई शर्मा, सौ. सुनिताताई अग्रवाल, आयटी सेल प्रमुख सौ. ऋचा शहा, सरचिटणीस सौ. रुपाली काकडे, महिला व बाल कल्याण सभापती सौ. आरती घोगलिया यांची प्रमुख उपस्थिती होती.




तज्ञ मार्गदर्शन व प्रात्यक्षिक 

कार्यक्रमाचे मार्गदर्शक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, KVK चे फलोद्यान तज्ञ श्री. गजाननजी तुपकर_ यांनी महिलांना शेती, भाजीपाला लागवड तसेच बिना फवारणीचे छतावर/अंगणात भाजीपाला कसा लावावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महिलांच्या शेतातील मातीचे परीक्षणही करण्यात आले.


मान्यवरांची वक्तव्ये


अकोला पूर्व चे आमदार श्री. रणधीर भाऊ सावरकर म्हणाले,_  

आजच्या महिला आणि मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. घर, शेती आणि समाज या तिन्ही ठिकाणी महिला शक्ती आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहे. अशा कृषी माऊलींचा सत्कार म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे.


_कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनीताई धोत्रे म्हणाल्या,_  

"पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात भाजीपाला असायचा. तो किती पौष्टिक आणि आरोग्यदायी होता. आज आपण आहारात अमृत घेतोय की विष हे आपणच ठरवायचं आहे. म्हणूनच प्रत्येक महिलेने किचन गार्डन करावं असं आवाहन मी करते."


सौ. वैशालीताई शेळके यांनी प्रास्ताविकात महिला शेतकरी धोरणाची माहिती दिली. सौ. चंदाताई शर्मा यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.


अभिष्टचिंतन व अभिवादन 

देवा भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. तसेच माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त, चंद्रशेखर आझाद व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका तथा झोन सभापती सौ. रश्मीताई अवचार आणि नगरसेविका सौ. सोनालीताई अंधारे यांनी केले. आभार सौ. प्राची काकडे यांनी मानले.


टिप्पण्या