मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

खासदार अनुप धोत्रे यांची नाश्त्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती

 




अकोला : आज भारताच्या राष्ट्रपती श्रीमती.दौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती भवन येथे आयोजित नाश्त्याच्या कार्यक्रमाला अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे उपस्थित होते.


राष्ट्रपती महोदयींशी झालेली त्यांची भेट नेहमीप्रमाणेच आत्मीय आणि प्रेरणादायी होती. त्यांचा साधेपणा, विनम्रता आणि शांत व्यक्तिमत्त्व देशातील कोट्यवधी नागरिकांना प्रेरणा देणारे आहे. संवादादरम्यान त्यांनी व्यक्त केलेले शब्द कायम स्मरणात राहतील.यावेळी त्यांनी सहकारी खासदारांसोबतही संवाद साधला..

टिप्पण्या