मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

मोटर सायकल चोरांची टोळी अकोला जिल्ह्यातून हद्दपार


अकोला : जिल्हयांतील मोटार सायकल चोरी करणा-या ०३ सराईत गुन्हेगारांच्या टोळीस मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत हद्दपार

करण्यात आले आहे.


अकोला जिल्हयात मोटार सायकल चोरीस आळा बसावा यादृष्टीकोनातून पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी मधील (१) प्रतिक एकनाथ वसु वय २३ वर्ष रा. लोखंडे ले आउट, मोठी उमरी, अकोला (२) मेहुल सुरेश जाधव वय १९ वर्ष रा. मंगरुळपीर जि. वाशिम. (३) प्रथमेश संजय सरोदे वय २० वर्ष रा. शिरोडा ता. जि. अकोला यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये अकोला जिल्हयातुन एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. 


पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी दिनांक २३ मे २०२५ रोजी पदभार स्विकारल्यापासून अकोला जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २९ सराईत गुन्हेगारांना अकोला जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे.


" अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यांचेवर येणा-या आगामी सण उत्सव काळात प्रभारी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणुन एमपीडीए, हद्दपारी व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे " असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.

टिप्पण्या