मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

अकोल्यात उन्हाचा तडाखा, मेडिकल कॉलेजमध्ये विशेष कक्ष सुरू करा - गिरीश जोशी यांची मागणी

 



अकोला : दिवसेंदिवस अकोल्यात उन्हाची तीव्रता वाढतच आहे. त्यामुळे अकोला मेडिकल कॉलेजमध्ये अतिदक्षता विशेष कक्ष सुरू करण्यात यावा अशी मागणी भाजपा प्रसिद्धीप्रमुख तसेच माजी नगरसेवक अभ्यासगत समिती सदस्य गिरीश जोशी यांनी केली आहे. 

अकोला जिल्ह्याचे तापमान विदर्भात व महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता आहे. उष्माघातामुळे नागरिक आजारी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर अकोला मेडिकल कॉलेजचे डीन यांनी विशेष कक्ष सुरू करण्याची गरज आहे. जेणेकरून नागरिकांना सुविधा मिळेल यासाठी तातडीने व्यवस्था करण्यात यावी तसेच यासंदर्भात समिती अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा दखल घेतली आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा देण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत.

टिप्पण्या