मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

  अकोला, दि. 19 : भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला पूर्व मतदारसंघातील काटी, वडद संघातील सधन कास्तकार गजानन अरुण चऱ्हाटे, लतीफशाह सरदारशाह, मंगेश पाटील चांदुरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कर्जमाफी, वीज माफी आणि विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम "देवा भाऊ" च्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, भरत चऱ्हाटे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, राजेश बेले, गोविंद गोयंका, विवेक भरणे, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक...

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

 



अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली.

फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो.




श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात.

याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 जणांनी रक्तदान केले.




 

  “शंभू चरित्र घराघरात


तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून “शंभू चरित्र घराघरात” हा विशेष उपक्रम राबवण्यात आला असून सुमारे 100 घरांमध्ये श्री विजयराव देशमुख लिखित राजा शंभू छत्रपती हे पुस्तक पोहोचविण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे, उपमहापौर अमोल गोगे, रणधीर सावरकर, दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्झापुरे, निमंत्रण हॉटेलचे संचालक तथा नगरसेवक हर्षल दादा भांबेरे उपस्थित होते. तसेच बंटी चुमडे ,किशोरजी मांगते, मोतीसिंग मेहता, शंकरराव वाकोडे, काजल राऊत यांनी सहउपस्थिती दर्शवली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या या समाजोपयोगी उपक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून संस्थेचे सर्व धारकरी याच्या यशस्वी नियोजनासाठी सक्रियपणे कार्यरत होते.

टिप्पण्या