मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

भाजप राष्ट्रवादीचे 60 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणा - देवेंद्र फडणवीस

 



अकोला : येत्या 15 जानेवारी 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या 60 पेक्षा जास्त उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकोला क्रिकेट क्लब येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

राज राजेश्वर मंदिराचा आराखडा पूर्ण करू त्यासाठी 50 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरालगतच्या हद्द वाढ क्षेत्राच्या विकासासाठी 138 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अकोला शहरातील डी पी आर मधील रस्त्यांसाठी विशेष निधी देण्याची सुद्धा घोषणा केली. अकोला शहराचा भौगोलिक, सामाजिक, आर्थिक विकास झाला पाहिजे या दृष्टीने 

दोन टप्प्यात शिवनी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. स्थानिक क्रिकेट क्लब येथे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते 





मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, आमदार अमोल मिटकरी, जयंत मसने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय देशमुख, माजी मंत्री रणजीत पाटील, किशोर पाटील, कृष्णा शर्मा, डीएम भांडे बळीराम सिरस्कार, बद्रू जमा, पुरुषोत्तम चितलांगे, डॉक्टर अमित कावरे, माधव मानकर, राजेश नागमते, नगराध्यक्ष हर्षद साबळे वैशाली पालीवाल, सुलभाताई दुतोंडे, मायाताई घुले, वसंत बाछुका अंबादास उमाळे, एडवोकेट देवाशिष काकड, संजय जोशी, रमेश आप्पा खोबरे, विवेक भरणे, डॉक्टर संजय शर्मा गणेश लोड गणेश तायडे, एडवोकेट रूपाली काकडे , विनोद मनवाणी विराजमान होते. 


अकोला शहराचा विकास होण्यासाठी व येथील बेरोजगारीचा प्रश्न दूर करण्यासाठी उद्योगधंदे सुरू होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने एमआयडीसीचा विकास व पायलट योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी अनेक योजना उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 25 वर्षाच्या आराखड्यानुसार जिगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. अकोला शहराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. पंधरा तारखेला तुम्ही मतदान करा 16 तारखेपासून जबाबदारी आम्ही घेतो अशा शब्दात त्यांनी अकोल्याचे पालकत्व घेतले. 


यावेळी आमदार अमोल मिटकरी, विजय देशमुख, दशरथ भांडे आमदार प्रकाश भारसाकळे, विजय अग्रवाल यांची भाषणे झाली. 

प्रास्ताविक आमदार रणधीर सावरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ शर्मा, भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्ध प्रमुख गिरीश जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले. 


धन्यवाद देवेंद्रजी


 राज राजेश्वर मंदिराला ब दर्जा व पन्नास कोटी रुपये निधी दिल्याबद्दल 'धन्यवाद देवेंद्रजी' फलक लावून देवा भाऊ चे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तसेच या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या विजयावर शिक्का मोर्तब केले.


मातृ शक्तींची लक्षणीय उपस्थिती 


एक वाजताची सभा चार वाजता सुरू झाल्यावर सुद्धा जनता जनार्दन मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाजत गाजत मातृ शक्ती मोठ्या संख्येने आल्या. 


ठीक ठिकाणी देवा भाऊचे अभिनंदन


विमान पायलट प्रशिक्षण केंद्र,पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय पोलीस वसाहत येथील कार्यकर्त्यांनी धन्यवाद चे फलक लावून देवा भाऊचे अभिनंदन केले. अकोलेकरांच्या वतीने भाजप नेत्यांनी श्री संत गजानन महाराज व महादेवाची प्रतिमा देवा भाऊंना अर्पण केली.



गिरीश जोशी यांच्या नेतृत्वातील समितीने अकोलेकरांच्या भावना जाणून महाविकास संकल्पनामा तयार केला. या महाविकास संकल्पनाम्याचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विमोचन केले.

टिप्पण्या