मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

हरीशभाई आलीमचंदानी यांची भारतीय जनता पक्षात घर वापसी

 



अकोला : भारतीय जनता पक्षाच्या संस्कारात जडणघडण झालेले जेष्ठ नेते, समाजसेवक हरीश भाई आलीम चंदानी यांना जास्त काळ पक्षाच्या बाहेरचे वातावरण भावले नाही. ते स्वगृही भारतीय जनता पार्टीत परतले आहेत. खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी आलीमचंदानी यांचे स्वागत केले आहे.


भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मा. नगराध्यक्ष हरीशभाई आलीमचंदानी, यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भावपूर्ण स्वागत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जयंत मसने यांनी केले. याप्रसंगी संतोष शिवरकर, वसत बाछुका, रंजीत खेडकर, बालटाले, रवींद्र भन्साली, गिरीश जोशी, अजय शर्मा, माधव मानकर, डॉक्टर अमित कावरे, सजय गोटफोडे, नितेश पाली यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


 यावेळी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन काम करू. पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचे पालन करेल अशा शब्दात हरीश आलीम चंदानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पक्ष नेतृत्व, प्रदेश आणि स्थानिक नेतृत्वाचे त्यांनी त्यांनी आभार मानले आहेत.

टिप्पण्या